बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

December 23, 2009 11:41 AM0 commentsViews: 2

23 डिसेंबर लोणावळ्यातून बेपत्ता झालेल्या नवी मंुबईतल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह सेंटॉर रिसॉर्टमधल्या स्विमिंग टँकमध्ये सापडला आहे. मृत विद्यार्थी नवी मुंबईतल्या कोपर खैराणे इथल्या जिजामाता हायस्कूलचा आहे. चिराग पटेल असं या 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचं नाव असून तो शाळेच्या सहलीसाठी लोणावळ्याला गेला होता. बुधवारी सहलीवरून परतल्यावर विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर पालक आणि पोलिसांनी शोध सुरू केला होता.

close