तक्रारी संदर्भाची माहिती एटीएमवर लावणे बंधनकारक

December 23, 2009 11:43 AM0 commentsViews: 4

23 डिसेंबर एटीएम मशीनच्या शेजारीच तक्रार कुठे करायची याचे स्पष्ट निर्देश दिलेले असावेत, असे आदेश आरबीआयने सर्व बँकांना दिले आहेत. त्यामुळे एटीएम मशीन वापरताना अडचण आल्यास तक्रार कुठे करायची? यापुढे ग्राहकांना हा त्रास होणार नाही. अनेक वेळा ग्राहक एटीएमचा वापर करताना अडचण आल्यास गोंधळात पडतात, तक्रार कुणाकडे करायची याचीही माहिती नसते. म्हणूनच आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. बँक ांचे हेल्पलाइन नंबरही यापुढे एटीएम सेंटर्समध्ये लिहिले जातील.

close