आता बोला, या गावात आहे चक्क शिव्या देण्याची प्रथा !

August 20, 2015 11:41 PM0 commentsViews:

20 ऑगस्ट : कुणी शिवी दिली तर साहजिकच तळपायाची आग मस्ताकात जाते…मग काय पुढे शिव्याला शिव्यातून उत्तर अन्यथा हे प्रकरण हातघाईवर येतं…पण सातार्‍यातील सुखेड आणि बोरी गावात एकमेकांना शिव्या द्यायची अनोखी प्रथाच आहे.satara_bori

शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी या ठिकाणी नागपंचमीचा दुसर्‍या दिवशी साजरी केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सुखेड आणि बोरी या दोन गावातील महिला एका ओढ्याच्या ठिकाणी येऊन एकमेकांना जोर जोरात हात हलवत शिव्या देतात. या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात. या कोणाला ऐकू येवू नये यासाठी यावेळी पारंपारिक वाद्यं वाजवली जातात. या दोन गावातील 2 महिलांची या ओढ्यावर भांडणं झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. ही प्रथा पाहण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक भागातून लोक या ठिकाणी येतात. ही प्रथा पाळली नाही तर गावावर रोगराई पसरते, अशी या महिलांची समजूत आहे. या महिला भांडत असताना त्यांना थोपवण्यासाठी महिला पोलीस आणि गावकर्‍यांची चांगलीत तारांबळ उडते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close