केंद्राची त्रिसदस्यीय समिती FTIIमध्ये दाखल

August 21, 2015 1:34 PM0 commentsViews:

FTII

21 ऑगस्ट : एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यापासून विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. एफटीआयआय संचालक मंडळ आणि विद्यार्थी संघटनांमध्ये वाद वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय केंद्रीय समिती आज (शुक्रवारी) एफटीआयआयमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. एस. एम. खान यांच्या नेतृत्वाखालील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची ही समिती काल (गुरूवारी) रात्रीच दाखल झाली होती आणि आज सकाळपासूनच समितीने एफटीआयआयची पाहणी सुरू केली आहे.

दरम्यान आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 70वा दिवस असून कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना एफटीआयायमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. एफटीआयआय विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. त्यामुळेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चा करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close