वेगळा विरोधी गट स्थापन करणार – बाळा नांदगावकर

December 23, 2009 1:17 PM0 commentsViews: 147

23 डिसेंबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळा विरोधी गट स्थापन करणार असल्याची घोषणा गटनेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनाचं सूप बुधवारी वाजलं. अधिवेशन संपताना विरोधी पक्षाने एक पत्रकार परिषद घेतली. पण त्यासाठी मनसेला आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे संतापलेल्या मनसेने आता वेगळा विरोधी गट स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेला आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यावर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती.

close