अण्णांच्या सुरक्षेत वाढ

August 21, 2015 5:10 PM0 commentsViews:

anna hazare security21 ऑगस्ट : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये. या आधी अण्णांना झेड सुरक्षा होतीच. मात्र आता या झेड सुरक्षेबरोबरच अतिरिक्त पोलीस अण्णांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे. त्यांचं कार्यालय आणि घर याठिकाणी स्थानिक पोलिसांची नेमणूक करण्यात आलीये.

अण्णा हजारेंना गेल्या काही दिवसांत 2 वेळा जीवे मारण्याच्या धमकीची पत्रं आलीयेत. पत्रांच्या पार्श्वभूमीवर अण्णांच्या सुरक्षेचं गृहविभागानं ऑडिट केलं. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवली गेलीये.

दरम्यान, मला धमक्या नवीन नाहीत, मला मारुन समाधान मिळत असेल तर ज़रूर मारा, मी त्याला घाबरत नाही. मरनाला घाबरुन जमणार नाही. समाज राष्ट्रीहितसाठी काम सुरू ठेवणार, जे करायचे ते करा मी थांबणार नाही असं सांगत अणांनी झेड प्लस सुरक्षेला नकार दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close