कांदा रडवणार, लवकरच शंभरी गाठणार ?

August 21, 2015 5:20 PM0 commentsViews:

onion3452321 ऑगस्ट : महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय. आता यात भरात भर कांदा टाकणार असून चांगलाच वांदा करणार आहे. कारण, कांदा आता शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही कांदा रडवणार असंच चित्र आहे.

लासलगाव बाजारपेठेत आज कांद्याचा भाव 5 हजार 701 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचलाय. कालच्या तुलनेत कांद्याच्या भावात 200 रुपयांनी वाढ झालीये. मनमाडच्या बाजारपेठेत 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आहे. येत्या काही दिवसांत कांदा आणखी महागण्याची शक्यता आहे. मुंबईत किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 80 रुपये किलो होता. सप्टेंबरमध्ये दुसर्‍या आठवड्यात नवा कांदा बाजारात आल्यानंतरच कांद्याचे भाव कमी होऊ शकतील असं सरकारतर्फे सांगण्यात आलंय. दुष्काळामुळं घटलेलं उत्पादन, साठेबाजी, कमी झालेली आवक यामुळे कांद्याचे भाव वाढलेत. पण, दक्षिण भारतात नवीन कांदा बाजारात यायला सुरुवात झाली. त्यामुळे काही दिवसांत कांद्याचे भाव उतरतील, असं व्यापार्‍यांचे म्हणणंय. कांद्याच्या भावात वाढ होत असली तरी त्याच्या फायदा मोजक्याच शेतकर्‍यांना होतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close