जुलै महिना ठरला जगातला सर्वाधिक उष्ण !

August 21, 2015 6:28 PM0 commentsViews:

summer-heat21 ऑगस्ट : ऑगस्ट महिना सुरू आहे तरी उन्हाळ्यासारखं ऊन सध्या जाणवतंय. पण, ही परिस्थिती फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ऍटमोस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नोआ या संस्थेच्या अहवालावरून हे सिद्ध झालंय.

या संस्थेच्या अहवालानुसार यावर्षीचा जुलै महिना हा जगातला आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण महिना ठरलाय. जुलै महिन्यात तापमान 1 पूर्णांक 46 अंश फॅरेनहाईटने वाढलंय. तापमानवाढीचं सर्वात मोठं कारण अलनिनो सांगितलं जातंय. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान हे सरासरीपेक्षा वाढलं तर जगभर त्याचा परिणाम होतो. त्याशिवाय वाढतं प्रदूषण कारखान्यांचा धूर, वाहनांमधला विषारी धूर या ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनातही वाढ झालेली दिसते. त्यामुळेही तापमानात वाढ झालीय. नोआ संस्थेच्या अंदाजानुसार परिस्थिती अशीच राहिली तर 2015 या वर्षांतले सुरुवातीचे सात महिने हे सुद्धा आत्तापर्यंतचे सर्वाधित उष्ण महिने ठरू शकतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close