‘आई मला माफ कर..,’ छेडछाडीच्या बळीनंतर आता तरी वर्दी’तले’ जागे व्हा !

August 21, 2015 7:03 PM3 commentsViews:

21 ऑगस्ट : “आई माफ कर मला, सॉरी पण तुला आणि सगळ्यांना माझ्या चुकीमुळे खूप त्रास झाला पण आता माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला…माफ कर…जमलं तर पुढच्या जन्मी तुझ्या पोटी येईल आणि खूप नाव कमवेल, त्या वेळेस नाही करणार कुठलीही चूक. काळजी घे स्वत:ची, माझा विचार करू नको…” हे मनसुन्न करणारं पत्र आहे छेडछाडीला कंटाळून जीवनयात्रा संपवलेल्या श्रुतीचं…श्रुतीने तर जगाचा निरोप घेतला पण या निष्पाप जीवाचा बळी घेण्यास पोलीसही तितकेच जबाबदार…वेळीच खाक्या वर्दीतला दम दाखवला असता तर हे पत्र लिहण्याची वेळ श्रुतीवर आली नसती. त्यामुळे या वर्दीला तरी जागे राहा असं ठणकावून सांगण्याची वेळ आली.shruti kulkarni letter

सततच्या छेडछाडीला वैतागून औरंगाबादच्या श्रुती कुलकर्णीनं आपलं आयुष्य संपवलं. श्रुती ही 22 वर्षांची एमबीएची विद्यार्थीनी होती. स्वप्निल मणियार या तरुणाचं श्रुतीवर एकतर्फी प्रेम होतं. स्वप्निल श्रुतीसोबत पदवीपर्यंत कॉलेजला होता. श्रुतीने त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या शिक्षणावर लक्ष देऊन स्वत:च्या पायावर उभं राहायचंय, असं तिने त्याला सांगितलं. श्रुतीला वडील नसल्यामुळे घरच्या जबाबदार्‍याही तिच्यावर होत्या. या सगळ्या परिस्थितीत तिला आधार देणं तर दूरच पण स्वप्निल तिची छेडछाड करायचा, अश्लील मेसेज पाठवायचा, पैशाचं आमिष दाखवून तिच्यावर लग्न कर म्हणून जबरदस्तीही करायचा. ग्रॅज्युएशन झाल्यावर श्रुती एमएबीला गेली तरी तो तिच्या कॉलजेमध्य जाऊन तिला त्रास द्यायचा.

श्रुतीच्या तक्ररीवरून पोलिसांनी याआधी स्वप्निलला अटकही केली होती. पण नव्या कायद्यानुसार छेडछाडीची गंभीर कलम न लावल्यामुळे स्वप्निलswapnil जामिनावर बाहेर आला आणि त्याने श्रुतीची छळवणूक सुरूच ठेवली. श्रुतीने ज्या दिवशी गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं.

त्यादिवशीही स्वप्निलने पुन्हा तिच्या घरी जाऊन श्रुतीची बहीण आणि आईला जीवे मारण्याची धमकी दिली. या दोघींनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली पण पीएसआय हरीश खटावकर यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. इकडे श्रुतीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू ओढवला.

तिच्यावर उपचार सुरू असताना पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्याचीही तसदी घेतली नाही. आता या प्रकरणी स्वप्निल मणियार फरार आहे. त्याचबरोबर ज्या पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात तपासात दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई करू, असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय.

श्रुतीच्या मृत्यूला तिची छेडछाड करणारा स्वप्निल मणियार हा तरुण जबाबदार आहे.तेवढेच पोलीसही जबाबदार आहेत, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. आता यावर कारवाया होतील, आरोपीला अटकही होईल पण निरपराध श्रुतीचा गेलेला जीव काही परत येणार नाही.

आत्महत्येस कारण की…
आई माफ कर मला, Sorry पण तुला आणि सगळ्यांना माझ्या चुकीमुळे खूप त्रास झाला पण आता माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला…माफ कर मला असं करायचं नव्हतं पण आई त्या स्वप्नीलने माझ्याकडे option ठेवला नाही. आज वर तो फक्त मला त्रास द्यायचा, आता तर दीदीलाही फोन करून त्रास देऊ लागला. उद्या काय करेल काय माहित मला तुझं नाव खूप मोठं करायचं होतं पण नाही करू शकले. त्यासाठी मला जमलं तर पुढच्या जन्मी तुझ्या पोटी येईल आणि खूप नाव कमवेल, त्या वेळेस नाही करणार कुठलीही चूक. काळजी घे स्वत:ची, माझा विचार करू नको….

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Patil Neeta

    bad new……………………

  • sandeep mahadik

    This is so sad that the police need to actually rub their face with DUNG.. What the hell were they thinking of doing when she was admitted! A serious case needs to be registered against police in charge of investigation… A serious loss of an intelligent and capable being for this society and the nation as a whole… Maharashtra should be ashamed of itself today!

  • Manoj M Chavan

    क्रूपया मुलींनी असा धीर सोडु नये असे मला वाटते़ काहीतरी वेगळे मार्ग शोधावेत़़ असल्या फालतू लोकांसाठी किंवा या लोकांमुळे आपल्याला संपवण्याचा मुर्खपणा करु नये. हे जग खुप मोठे आहे. आता तर तंत्रद्न्यानाने फार जवळही आले आहे. याचा उपयोग करुन आपला आवाज आपली समस्या जगापर्यंत पोहचवायला हवी. पहा फरक पडेल !

close