FTII च्या ‘महाभारता’चा अंक संपण्याच्या मार्गावर !

August 21, 2015 10:35 PM0 commentsViews:

ftii student343421 ऑगस्ट : गेल्या दीड महिन्याभरापासून FTII चा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयच्या तीन सदस्यांचं शिष्टमंडळ पुण्यात आलंय. त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली, आणि आंदोलन लवकरच संपेल, असा विश्वास या शिष्टमंडळाचे प्रमुख एस एम खान यांनी व्यक्त केलाय.

पुण्यातील फि ल्म अँड इन्सिट्‌ट्यूट ऑफ इंडिया अर्था एफटीआआयच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. पण त्यांच्या नियुक्तीला विरोध करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. तब्बल दीड महिन्यांपासून विद्यार्थी संपावर आहे. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीये. आज या विद्यार्थ्यांशी शिष्टमंडळातल्या अधिकार्‍यांनी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली, आणि आंदोलन लवकरच संपेल, असा विश्वास या शिष्टमंडळाचे प्रमुख एस एम खान यांनी व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांनीही चर्चेबद्दल समाधन व्यक्त केलं. मात्र संप सुरूच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं. चर्चेत फक्त गजेंद्र चौहान यांचाच मुद्दा नव्हता तर इतरही प्रश्नांवर चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं. हे शिष्टमंडळ लवकरच आपला अहवाल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे पाठवणार आहे. त्यानंतर यावर केंद्र निर्णय घेणार आहे. दरम्यान, संचालक प्रशांत पाठराबे यांच्यावर केंद्रातून कोणताही दबाव नसल्याचंही टीमनं स्पष्ट केलं. दोनच दिवसांपूर्वी पाठराबे यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे 5 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती आणि जामीनही देण्यात आला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close