मुंबईत 15 दिवसांत तापाने सहा जणांचा मृत्यू

August 21, 2015 8:44 PM0 commentsViews:

feaver21 ऑगस्ट : मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत अज्ञात तापाने सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मलेरिया, एच1 एन 1, डेंग्यू या आजारांच्या व्यतिरिक्त इतर प्रकारच्या तापाने या सहा जणांचा मृत्यू झाल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. सहापैकी एक मृत्यू ऍक्यूट फेब्राईल इलनेसने झाल्याचा संशय व्यक्त होतोय. तर इतर 5 जणांच्या मृत्यूंच्या कारणांविषयी अजूनही स्पष्टता नाहीये. पोस्टमॉर्टमनंतर या अज्ञात तापाचं कारण समजू शकेल अशी माहिती महापालिकेनं दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close