पुण्यात प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

December 24, 2009 10:25 AM0 commentsViews: 4

24 डिसेंबरपुण्यात गुरुवारपासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय बुधवारी घेण्यात आला. शहरात कचर्‍याचा प्रश्न गंभीर झाल्याने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालावी, असा प्रस्ताव स्थायी समितीने 23 मे रोजी मंजूर केला होता. त्याला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिली. असा निर्णय घेणारी पुणे महानगरपालिका असल्याचा दावा केला जात आहे. यापुढे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍यांना 50 ते 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणार्‍यांना 3 ते 10 हजारांचा दंड भरावा लागेल.

close