बूलेटप्रुफ जॅकेट खरेदीची गहाळ फाईल सापडली

December 24, 2009 10:33 AM0 commentsViews: 5

24 डिसेंबर अनेक महिन्यांपासून गहाळ असलेली बूलेटप्रुफ जॅकेट खरेदीची फाईल अखेर सापडली आहे. डीसीपी हेडक्वार्टर 1 मध्ये ही फाईल मिळाली आहे. फाईलची जबाबदारी असलेल्या मुंबई पोलीस दलातील खरेदी विभागाच्या तीन क्लार्कना निलंबित करण्यात आलं आहे. या फाईलची चौकशी करण्यासाठी अतिरीक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) संदिप बिश्नोई यांची नेमणूक करण्यात आली होत. ही चौकशी पुर्ण झाली असून त्यासंबधीचा रिपोर्ट गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. या संदर्भात गृह मंत्रालय गुरुवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र या फाईलची काही पानं गायब झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौडकर यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली हाती.

close