दाऊद पाकिस्तानातच ; नवा फोटो आणि पत्ता उघड !

August 22, 2015 1:24 PM1 commentViews:

Dawood Photo orignal photo

22 ऑगस्ट : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच लपून बसलाय याचा पुरावा समोर आल्यामुळे पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटलाय. वारंवार भारताकडून दाऊद पाकिस्तानात असल्याचा पुरावा दिला. पण पाकिस्तान ते नाकारलं होतं. आता दाऊद सध्या पाकिस्तानातच असल्याचा पुरावा ‘हिंदुस्थान टाईम्स’ या वृत्तपत्रानं प्रकाशित केला. एवढंच नाहीतर दाऊदचे सध्याचे फोटो, त्याचं टेलिफोन बिल, पासपोर्टही प्रकाशित करण्यात आलंय.

गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार दाऊद, त्याची पत्नी मेहजबीन शेख मुलगा मोईचन नवाज आणि मुलगी मेहरुख, मेहरीन आणि माझिया पाकिस्तानात रहात असल्याचं उघड झालंय. दाऊदचं एप्रिल 2015 चं टेलिफोन बिल ही ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या हाती लागलंय. या बिलावर दाऊदचा कराचीमधला पत्ता उघड झालाय. दाऊदचे कुटुंबिय पाकिस्तान आणि दुबईदरम्यान प्रवास करत असल्याचे पुरावेसुद्धा देण्यात
आले आहे. दाऊदचा सध्याचा फोटो पाहिला तर त्याच्यावर कोणतीही सर्जरी झाली नसल्याचंही स्पष्ट झालंय. 4 जानेवारी 2015 ला दाऊदची पत्नी आणि मुलींनी कराची ते दुबई विमान प्रवास केल्याचं उजेडात आलंय.

असा दिसतो दाऊद

या दोन्ही फोटोमधून दाऊदचं वाढलेलं वय देखील सहज लक्षात येतंय. हिंदुस्थान टाईम्सने आज हा फोटो प्रसिद्ध केलाय. त्यामुळे दाऊद आता नेमका कसा दिसतोय हे तरी जगासमोर आलंय. नाहीतर इतके दिवस सर्व प्रसारमाध्यमं दाऊद तोच तो जुना फोटो दाखवायची..पण हिंदुस्थान टाईम्सने थेट दाऊदच्या कराचीमधल्या पासपोर्टवरचाच फोटो पब्लिश केलाय.

दाऊदचा पासपोर्टवरचा पत्ता
डी – 13 . ब्लॉक – 4 , कराची डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, सेक्टर – 5 , क्लिफ्टन ,कराची,पाकिस्तान

दाऊदच्या पत्नीचं नाव मेहजबीन शेख
त्याच्या मुलाचं नाव – आहेमोईचन नवाज
3 मुली – मेहरुख , मेहरीन आणि माझिया

दाऊदमुळे पाकिस्तानला कसा फायदा होतो ?
– बांधकाम व्यवसायात दाऊदची मोठी गुंतवणूक
– दक्षिण आशियातल्या ड्रग स्मग्लर्स आणि कट्टरतावाद्यांना पैसा पुरवतो
– दाऊदच्या काळ्या धंद्यात वर्षांला साडे तीन अब्ज डॉलर्सची उलाढाल
– दाऊदच्या काळ्या धंद्याचा पाकिस्तानला फायदा
– दाऊदच्या व्यवसायाचा पैसा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेत येतो
– भारतानं 2011 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमधल्या यूएईमधल्या दाऊदच्या 11 कंपन्यांचे पुरावे पाकिस्तानला दिले होते

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Meena Paes

    zoplelyala jaaga karata yeta pann zopech song ghetleyal pakistanla jaag karanyasathi vegallach funda vaprala hava. dawoodchi Dubaitali property japt karne ha ek nava upukt fund hou shakto.

close