नागपुरात दुहेरी हत्याकांड, दोघांची गळा चिरून हत्या

August 22, 2015 2:04 PM0 commentsViews:

kolhapur crime22 ऑगस्ट : नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी जावई आणि मेव्हण्याची निर्दयपणे गळे चिरून हत्या करण्याची खळबळजनक घटना घडलीये.

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड रोडवरील तरोडी बुर्दुक गावाजवळ पुनित्री गौतम आणि सोमेश्वर पटले यांचे मृतदेह सापडल्याने ही घटना उघडकीस आली.

शेतातील ग़वत कापण्याचे काम करणार्‍या दोघांना कुणी मारले आणि घटनेमागचे कारण काय याचा तपास सुरू आहे. दोघांच्याही खिशात पैसे सापडल्याने चोरीच्या उद्देशाने हे खून झाले नसावे तर अनैतिक संबंधातून किंवा पूर्व वैमन्यासातून हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक तपासात पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close