मला अजूनही खूप कामं करायचीय -शरद पवार

August 22, 2015 2:15 PM1 commentViews:

sharad pawar 7522 ऑगस्ट : वयाची 75 वर्षे पूर्ण होत असली तरी आपण वय विसरुन आजपर्यंत समाजकारण आणि राजकारणात काम करत आहोत. त्यामुळे माझ्या वयाची फारशी काळजी करू नका. मला आणखीही कामं करायचीत अशी इच्छा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवलीय.

महाराष्ट्रातले ज्येष्ठ ,अनुभवी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लवकरच वयाची पंचाहत्तरी पूर्ण करतायत. शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बारामतीच्या एन्व्हार्यमेंटल फोरमच्या वतीने सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमास पवार यांचे कुटुंबीय हजर होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपल्याला वयाची जाणिव करुन दिली जाते, मात्र आपण वय विसरुन काम करत आलोय आणि पुढेही आपल्याला बरीच कामं करायचीत असं भावनिक वक्तव्य केलं.

शरद पवार हे बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांचे वर्गशिक्षक असलेल्या श्रीधर गोगटे यांच्या हस्ते त्यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा या कार्यक्रमातील आकर्षणाचा विषय ठरला. यावेळी गोगटे यांनी शालेय जीवनातील शरद पवार कसे होते याबाबतच्या आठवणी सांगितल्या. आता येणार्‍या काळात शरद पवार यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • milind

    fakta widhayak kame kara jatipatiche rajkaran karu naka.

close