सवाई गंधर्व महोत्सव यंदा जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात

December 24, 2009 10:37 AM0 commentsViews: 1

24 डिसेंबरसंगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुण्यात 7 ते 10 जानेेवारी दरम्यान होणार आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये हा महोत्सव पार पडतो. पण यंदा H1N1च्या साथीमुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. जानेवारी महिन्यात हा महोत्सव पार पडणार असल्याची माहिती महोत्सवाचे सहसचिव श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या या महोत्सवाचं यंदाचं 57वं वर्ष आहे. चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात पंडित जसराज यांचं शास्त्रीय गायन, उल्हास कशाळकर तसंच देवकी पंडीत यांचं गायन, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन, मल्लिका साराभाई यांचं नृत्य आदी दिग्गज कलाकारांच्या कलेचं सादरीकरण महोत्सवात पहायला मिळणार आहे.

close