श्रुती कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी अखेर एएसआय हरीष खटावकर निलंबित

August 22, 2015 3:49 PM0 commentsViews:

harish_khatavkar322 ऑगस्ट : तक्रार करण्यासाठी आलेल्या श्रुती कुलकर्णीची मदत न करता उलट मानहानिकारक विधानं करणार्‍या पोलीस निरीक्षक हरीष खटावकर यांना निलंबित करण्यात आलंय. मानहानिकारक शब्द वापरल्याप्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खटावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीये.

औरंगाबादमध्ये सिडको एन-6 भागात राहणार्‍या श्रुती कुलकर्णीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. स्वप्नील मनियार हा तरूण श्रुतीच्या मागावर होता. श्रुतीने आपल्याशी लग्न करावं यासाठी तो श्रुतीला त्रास देत होता. स्वप्नीलच्या त्रासाला कंटाळून श्रुतीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली.

तीने याअगोदर स्वप्नीलची सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता सिडको पोलीस स्टेशनचे एएसआय हरीष खटावकर यांनी तिची मदत तर दूरच उलट तिची मानहानी केली. तुला वडील नाही त्यामुळे तुम्ही मुली अशा वागतात. तुझ्यामुळेच तो मागावर आहे अशा हीन शब्दात खटावकर यांनी श्रुतीवर शितोंडे उडवले होते.

श्रुतीच्या बहिणीने याविरोधात तक्रारही केली. एका पोलीस अधिकार्‍याने अडचणीत सापडलेल्या तरुणीची मदत न करता वर्दीचा रोख दाखवल्यामुळे सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खटावकरांवर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी काल शुक्रवारीही दोन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close