पाकिस्तानचं चर्चेपासून पळतंय, स्वराज यांनी सुनावलं

August 22, 2015 6:18 PM0 commentsViews:

sushma swaraj on pak22 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सल्लागारांच्या बैठकीवरून चांगलाच वाद पेटलाय. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं. दहशतवादाची समस्या सुटल्याशिवाय काश्मीरवर चर्चा होणार नाही अशा स्पष्ट शब्दात स्वराज यांनी पाकला फटकारलं. तसंच उलट पाकिस्तानचं चर्चेपासून दूर पळतंय कारण पाकला माहितीय आम्ही जिवंत अतिरेक्याला त्यांच्यासमोर उभं करू असा टोलाही लगावला. मात्र, एवढं होऊनही पाकने भारताच्या अटी फेटाळून लावल्यात आणि काश्मीरवर चर्चा होणार आणि हुर्रियत नेत्यांशी भेट घेणारच असा पवित्रा घेतलाय.

उद्या 23 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार आहे. पण, या बैठकीवर आता अनिश्चितेचं सावट निर्माण झालं. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी भारतात आल्यावर काश्मीरमधील फुटीरतावादी हुर्रियत नेत्यांच्या भेटीचा हट्ट धरलाय. भारताने हुर्रियत नेत्यांची भेट घेतली तर चर्चा होणार नाही असं स्पष्ट शब्दात ठणकावलंय. आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानाला खडेबोल सुनावले. सल्लागार स्तराची बोलणी पाकचे पंतप्रदान नवाझ शरीफ यांनाच नकोच होती. ती रद्द व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते, असा गंभीर आरोप स्वराज यांनी केला. 90 च्या दशकात आम्ही लाहोरला गेलो, त्याच्या बदल्यात आम्हाला कारगिल मिळालं, अशी भावनिक टीकाही त्यांनी केली. भारत पाक बोलणींमध्ये कोणताही तिसरा पक्ष चालणार नाही, तुम्ही हुर्रियतशी बोलणी करण्याचा हट्ट सोडा, असंही सुषमांनी ठणकावलं.

दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन भारतावरच दोषारोप केले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून मंत्रीपदाच्या स्तरावरची बैठक भारत इतक्या तकलादू कारणावरून रद्द करू शकतं का? आणि तेही जेव्हा या बैठकीचं उद्दिष्ट सीमेवरचा तणाव कमी करणं आणि दोघांमधला विश्वास पुन्हा निर्माण करणं हे होतं. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि तज्ज्ञ या प्रश्नावर विचार करतील अशी मी अपेक्षा करतो असं अजीज म्हणाले.

चर्चेत काश्मीरचा प्रश्न हवाच !

अजीज यांची पत्रकार परिषद होत नाही तेच पाक सरकारने सुषमा स्वराज यांच्या पत्रकारपरिषदेला उत्तर दिलं. भारताच्या अटी आम्हाला अमान्य आहे. हुर्रियत नेत्यांची भेट घेण्यात काहीही गैर नाही. अजीजही भेट घेणार आहे. या बैठकीच्या चर्चेमध्ये काश्मीरचा मुद्दा कायम राहिलं असं पाकिस्तानने स्पष्ट केलं. तसंच कुठल्याही पुर्वअटी मान्य नाही असं सांगत आपली भूमिका संध्याकाळपर्यंत स्पष्ट करणार असं सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close