मुंबईत पुढच्या आठवड्यापासून 10 टक्के पाणीकपात !

August 22, 2015 7:51 PM0 commentsViews:

mumbai water issues22 ऑगस्ट : धरणक्षेत्रात पावसानं दडी मारल्यानं मुंबईत पाणीकपातीचं संकट ओढावलंय. पुढच्या आठवड्यापासून दहा टक्के पाणीकपात होणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रांमध्ये पावसानं दडी मागल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. दहा टक्के पाणी कपात करून संपूर्ण वर्षाचं पाण्याचं वेळापत्रक तयार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिनाही कोरडाच गेल्यानं भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता मुंबईकरांनी पाणी जरा जपूनच वापरण्याची गरज आहे. विशेष म्हणजे मुंबईत जुलै आणि जून महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र, जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवलीये. त्यामुळेच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close