तो मी नव्हेच : कसाबचं नाटक सुरूच

December 24, 2009 10:57 AM0 commentsViews: 10

24 डिसेंबरकसाबने गुरुवारी पुन्हा कोर्टात नन्नाचा पाढा वाचला. अबू हमजा याला मी संपर्क केला नाही आणि मी बोटीने नाही तर समझोता एक्सप्रेसने आलो असं कसाबचं म्हणणं आहे. माझा जवाब ज्या न्यायाधीश मॅडमनी घेतला त्यांनी माझा जबाब बदलला आहे. माझा लिहून घेतलेला जबाब वेगळाच होता. अशी जबानी कसाबने कोर्टात दिली. मी सीएसटी स्टेशनच्या हल्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. हल्याच्या वेळी मी तिथे नव्हतो असंही कसाबचं म्हणणं आहे. तसंच कोणत्याही पोलीस अधिकार्‍याला मी मारलेलं नाही, तर पोलिसांच्या गाडीवर फायरींगही केलं नाही. अशी जबानी अजमल कसाबने गुरुवारी कोर्टात दिली. कसाबच्या खटल्याची पुढची सुनावणी 6 तारखेला होणार आहे.

close