तेलंगणाच्या मुद्यावरुन पुन्हा हिंसक निदर्शनं

December 24, 2009 12:45 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबर केंद्र सरकारने स्वतंत्र तेलंगणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे तेलंगणा समर्थकांनी हैदराबादच्या रस्त्यावर हिंसक निदर्शनं केली. तेलंगणाच्या 10 जिल्ह्यांत 48 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे. उस्मानिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निदर्शनं केली. तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनीही तात्काळ आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभेच्या अध्यक्षांकडे पाठवला आहे. स्वतंत्र तेलंगणावर राजकीय सहमती नसल्याचं सांगत केंद्र सरकारने हा मुद्दा गुंडाळला आहे. निर्णय घेण्यापूर्वी आणखी चर्चा आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी बुधवारी म्हटलं होतं.

close