वोटबँकेचं राजकारण करणार नाही – नितीन गडकरी

December 24, 2009 12:47 PM0 commentsViews:

24 डिसेंबर आपण वोटबँकेचं राजकारण करणार नसल्याचं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच योग्य मुद्यांवर सरकारला मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे नव्हे तर भाजपाच्या घटनेनुसार आपली नियुक्ती झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्लीत पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली पुढची वाटचालीबद्दल पत्रकारांना माहिती दिली. सेना-भाजप मध्ये कोणतेही मतभेद नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आपण मुंबईला परतल्यावर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

close