जलयुक्त शिवार योजनेसाठी आमीरची 11लाखांची मदत

August 23, 2015 2:10 PM0 commentsViews:

CM and Aamir

23 ऑगस्ट : अभिनेता आमीर खान याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 11 लाख रुपयांची मदत केल्याचे, फडणवीस यांनी शनिवारी ट्विटरवरून जाहीर केले आणि त्यासाठी त्यांचे आभारही मानले.

तीन दिवसांपूवच् आमीर खान आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली होती. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट असल्यामुळे ग्रामीण भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर कायमच सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनेता आमीर खान यांनी खास जलयुक्त शिवारसारख्या योजनेसाठी ही मदत केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close