कायदा पाळा आणि मुंबईत रहा – मुख्यमंत्री

December 24, 2009 12:49 PM0 commentsViews: 1

24 डिसेंबर मुंबईत राहण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण इथला कायदा पाळूनच सर्वांना राहावं लागेल. असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नवीन रेल्वे गाड्यांच्या फेर्‍यांची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात बोलताना महापौर श्रध्दा जाधव यांनी मुंबईतील वाढत्या लोंढ्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावरच मुख्यमंत्री बोलत होते. काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये शरद पवार यांनी मनसेच्या भूमिकेवर नाव न घेता टीका केली होती. पण शुक्रवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी थोडी वेगळी भूमिका मांडली.

close