देशभरात 50 ‘सोलार सिटी’ ; नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि शिर्डीचा समावेश

August 24, 2015 8:10 AM0 commentsViews:

solar city424 ऑगस्ट : देशभरातील पन्नास शहरांना सोलर सिटी अर्थात सौर शहरांसारखं विकसित करण्यासाठी जो मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता, त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. या पन्नास शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि शिर्डी या चार शहरांचा समावेश आहे.

हा मास्टरप्लॅन तयार करण्यासाइी 2009 साली अपारंपरिक उर्जा मंत्रालयाने सव्वीस तज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालात देशभरातील पन्नास शहरांमध्ये सौरऊर्जेचा वापर करुन वीजेची बचत कशी करता येईल याचा प्लॅन तयार केला.

ज्या शहरांची लोकसंख्या पन्नास हजार ते पन्नास लाख यादरम्यान आहे अशा शहरांची निवड या प्रोजेक्टसाठी करण्यात आली. या पन्नास शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि शिर्डी या चार शहरांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे आणि शिर्डी ‘पायलट सोलर सिटी’ तर नागपूर ही ‘मॉडेल सोलर सिटी’ बनणार आहे. या सोलर सिटी प्रोजेक्टसाठी सरकारने आत्तापर्यंत चोवीस कोटी रुपये मंजूर केले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close