रितेश देशमुख साकारणार शिवरायांची भूमिका !

August 24, 2015 8:34 AM0 commentsViews:

ritesh deshmukh24 ऑगस्ट : ‘लय भारी’ सिनेमामध्ये रितेश देशमुखची ‘माऊली’ची भूमिका चांगलीच गाजली. आता रितेश शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे.

‘लय भारी’ या सिनेमाची यशस्वी निर्मिती केल्यानंतर रितेश आणि जेनेलियाची जोडी नव्या सिनेमाच्या तयारीला लागलीये. मुंबई फिल्म कंपनी या आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या आगामी सिनेमाची घोषणा नुकतीच जेनेलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असल्याचं तिने जाहीर केलं होतं. हा सिनेमा म्हणजे मोठी जबाबदारी असल्याचंही तिने स्पष्ट केलंय. या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका स्वतः रितेश साकारणार असल्याचीही चर्चा आहे. रितेशने पहिल्यांदाच लय भारी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत एंट्री मारली होती. लय भारीतील रितेशची ‘माऊली’ची भूमिका चांगलीच गाजली होती. आता रितेश शिवरायांच्या भूमिका दिसणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

 
Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close