आठवड्यातून एकदा पाणी नाही : पालिकेचा नवा प्रस्ताव

December 24, 2009 12:52 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबरमुंबईत येत्या पंधरा जानेवारीपासून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला आहे. महानगरपालिकेचे आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी ही माहिती दिली. या संदर्भातला निर्णय दोन आठवड्यात घेतला जाणार आहे. सुरूवातीला दोन आठवड्यांसाठी प्रायोगिक तत्वावर हा निर्णय लागू केला जाणार आहे. मात्र यावर गटनेत्यांची सहमती झाल्याशिवाय हा निर्णय राबवता येणार नाही. दरम्यान, म्हाडाच्या नवीन इमारतींमध्ये प्रतिमाणशी 45 लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या इमारतींना दर दिवशी दोन लाख लीटरपेक्षा जास्त पाणी पुरवठा होतो. त्यांच्यावर हा निर्णय बंधनकारक असेल. तर जुन्या इमारतींमध्य मात्र प्रत्येकी 90 लिटर पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

close