दुसरा राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्याचा केंद्राचा विचार

December 24, 2009 1:42 PM0 commentsViews:

24 डिसेंबरकेंद्र सरकार दुसरा राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्याचा विचार करत आहे. आयबीएन-लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणातल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या आयोगाविषयीचा निर्णय घेतला जाईल. या आयोगाची निर्मिती झाली तर तेलंगणासोबतच विदर्भासारख्या अन्य स्वतंत्र राज्यांच्या मागण्यांचासुद्धा एकत्र विचार केला जाऊ शकतो. तेलंगणाबरोबरच, विदर्भ आणि इतर मागण्यांचा विचार करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्याचा विचार केंद्र करत आहे.

close