रानडुकराच्या हल्ल्यातून म्हशीने वाचवले मालकाचे प्राण !

August 24, 2015 1:38 PM0 commentsViews:

 24 ऑगस्ट : रानडुकरांच्या हल्ल्यात लोकांचे प्राण गेल्याचे किंवा जखमी झाल्याचे आपण नेहमीच ऐकतो मात्र रानडुकराने हल्ला केल्यावर एखाद्याचा प्राण वाचविण्यासाठी मालकाच्या हाकेवर धावत येवून रानडुक्कराशी झुंज देऊन त्याला पळवून लावून मालकांचे जीव वाचण्याचा पराक्रम एका भुरी नावाच्या म्हशीने केलाय.

gondiya bafellowही आहे भुरी नामक ( म्हैस ),खरं तर ही एक पाळीव म्हैसच आहे मात्र, काल रविवारी हीने जे काम केलंय त्यामुळे ही ही म्हैस शेतकर्‍यात चर्चेचा विषय झाली आहे. गोंदिया तालुक्यातील तेढवा येथील शेतकरी दुर्योधन सिंहमारे हा आपल्या पत्नी सह म्हशीला चारण्याकरिता शेतावर घेऊन गेले होते. सिंहमारे दाम्पत्य शेतीतील काम करीत असताना नेमकं त्याच वेळेस रानडुकराने दुर्योधन यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीवर आणि इतर 3 लोकांवर त्यानी हल्ला चढविला दुर्योधन मोठ्या प्रमणात जखमी झाले होते.

मात्र, रानडुक्कर त्यांच्यावर सतत हल्ला चढवीत असताना शेवटी दुर्योधन यांची पत्नीने त्यांच्या पाळीव म्हशीला जीवाच्या आकांताने आवाज मारलं आणि मालकीनीची हाक एकताच ही भुरी नावाची म्हैस धावत आली आणि मालकावर हल्ला चढविणार्‍या त्या रानडुक्कराशी झुंज दिली म्हशीचे रौद्ररूप पाहून शेवटी रानडुक्कराने तिथून पळ काढला.

रानडुक्करामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नेहमीच नुकसान होते तर कितेक वेळा लोकांना ही आपले प्राण गमवावे लागतात. मात्र, या रानडुक्करानची हत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने शेतकरी रानडुक्करांचे काहीही करू शकत नाही. या हल्ल्यात जखमी 3 लोकांचे उपचार हे दासगावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे तर गंभीर जखमी झालेल्या दुर्योधन आणि बसंती सिंहमारे या दाम्पत्यावर गोंदियाच्या जिल्ह्यसामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

वन विभागतर्फे या दाम्पत्यांना प्राथमिक उचारासाठी 4,000 रुपयाची मदत देण्यात आली आहे मात्र या हल्यात जखमी झालेल्या लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न वन विभागाकडून करण्यात येणार असल्याचा वन परिक्षेत्र अधिकारी यांनी सागितलं आहे तर या हिंसक रानडुकराला पकडण्याकरिता वन विभाग पूर्ण प्रयत्न करत असलायचे वन अधिकारी सागत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close