‘धान्यापासून मद्यनिमिर्ती करणार्‍या कारखान्यांना सबसीडी नको’

December 24, 2009 1:46 PM0 commentsViews: 82

24 डिसेंबर मद्य निर्मिती करण्यापेक्षा धान्य सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे धान्यापासून मद्यनिर्मिती करणार्‍या कारखान्यांना सबसीडी देऊ नये, अशी सूचना शरद पवार यांनी केली आहे. खराब झालेल्या धान्यापासून ही दारू तयार करण्यात येणार असल्याने धान्य टंचाई निर्माण होणार नाही असंही ते म्हणाले. मद्यनिर्मितीच्या मुद्यावरून राज्यात वाद निर्माण झाला होता. या निर्मितीला अनेकांनी विरोधही केला होता.

close