शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

August 24, 2015 8:40 PM0 commentsViews:

24 ऑगस्ट : मराठवाड्यात सलग चौथ्याही वर्षी दुष्काळ पडल्याने अनेकांचा धीर खचत चालला आहे. रोज कुठून ना कुठून तरी शेतकरी आत्महत्येची बातमी कानावर धडकतचे आहे. आत्महत्येचं हेच लोण तात्काळ थांबावं, यासाठी स्कायमेटने एक व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये पावसाअभावी वैफल्यग्रस्त बनत चाललेला शेतकरी आणि त्याच्या मुलीच्या मनातली घालमेल अतिशय उत्तमपद्धतीने मांडण्यात आली आहे.

SKY MET VIDEOS

आपल्या बापाने आत्महत्या करू नये, यासाठी ही चिमुरडी वेळी प्रसंगी शाळा बुडून त्याच्यावर नजर ठेवते. घरातली रस्सीही लपवून ठेवते. वडलांचं मन प्रसन्न राहावं यासाठी तिचे हरतर्‍हेचे प्रयत्न सुरू असतात. पण अचानक एक दिवस तिने लपवून ठेवलेली रस्सी गायब होते आणि तिथेच त्या चिमुरडीच्या काळजाचा ठोका चुकतो. पित्यामागे ती धावत सुटते आणि आपल्या जन्मदात्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करते. म्हणूनच शेतकर्‍यांनो तुम्हीही आत्महत्येचा विचारही तुमच्या मनाला शिवू देऊ नका, कारण जीवन हे खूप सुंदर आहे. तुमच्याही घरी कोणीतरी तुमची कोणीतरी वाट पाहत असेल. दुष्काळाचं काय घेऊन बसलात, तो आज ना उद्या हटणारच आहे..!

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close