धान्यापासून मद्यनिर्मितीला विरोधकांचीही संमती

December 25, 2009 9:37 AM0 commentsViews: 3

25 डिसेंबर धान्यापासून मद्यनिमिर्ती करण्याचा चंगच सत्ताधार्‍यांनी बांधलाय. अशा प्रकारे मद्यनिर्मिती करण्यावरून विधिमंडळ अधिवेशनात बराच गदारोळ झाला. विरोधकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला. पण आता भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनीच या निर्णयाला आमचा होकार असल्याचं स्पष्ट केलंय. हा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतल्याचं ते म्हणालेत. धान्यापासून मद्यनिर्मिती करण्याचा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतला आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही, असं भारतीय जनता पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरुवारीच शिर्डी येथे बोलताना मद्यनिर्मितीला सरकारने अनुदान देऊ नये असं म्हटलं होतं. तर केवळ खराब धान्यापासूनच ही मद्यनिर्मिती होणार असल्यानं कुठल्याही प्रकारची धान्य टंचाई जाणवणार नाही, असंही पवार यांनी म्हटलं. आता या मद्यानिर्मितीला सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही संमती असल्याचं स्पष्ट झालंय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, डॉ. अभय बंग, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आदींनी अशा मद्यनिर्मितीला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती.

close