गोंदियात तरुणीची संशयास्पद हत्या, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षावर कुटुंबीयांचा संशय

August 24, 2015 10:47 PM0 commentsViews:

das;ruhuea

24 ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यात तरुणीला जाळून विहिरीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोनारटोला या गावात घडला आहे. हत्येआधी आरतीवर सामूहिक अत्याचार झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. आरती बरसे असं या पीडित तरूणीचं नाव असून छेडछाडीसारख्या गंभीर गुन्ह्याला तंटामुक्त समितीकडे तडजोडीसाठी पाठवण्यात आल्याने तिला आपला जीव गमवावा लागला आहे.

योगराज चकोले हा नेहमी आरतीची छेड काढायचा. या बाबत आरतीने सालेकसा पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. मात्र सालेकसा पोलिसांनी छेडखानीच्या या गंभीर गुन्ह्याला क्षुल्लक समजून ज्याने छेड काढली त्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकडेच ते प्रकरण तडजोडीसाठी पाठवलं. आरतीची बदनामी होईल अशी भीती दाखवत 100 रूपयांच्या स्टँपपेपरवर योगराज आणि आरतीत समझोता केला. पण तडजोड झाल्यानंतरही आरतीची छेडछाड थांबली नाही. कुणी माझं काय बिघडवलं असा ओरडत तो आरोपी गावात फिरत असल्याचं आरतीच्या मामा अनिल वानखेडे यांचं म्हणण आहे.

आरतीची हत्या होऊन पाच दिवस झाल्यावरही यासंबंधातल्या पोलीस तपासाला वेग आलेला नाही. पोलिसांनी वेळीच गुन्हा नोंदवून कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता. मात्र हलगर्जीपणा करण्यात आला आणि त्या निष्पाप तरूणीचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण असा सवाल तिचे कुटुंबिय विचारत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close