मोदींच्या राज्यात नवा लोकनेता, ओबीसी आरक्षणासाठी एल्गार

August 25, 2015 10:09 AM0 commentsViews:

hardik patel25 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये एक नवा नायक पुढे आलाय. अवघ्या 22 वर्षांचा हार्दिक पटेल जनमानसाचा हिरो ठरलाय हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन छेडण्यात आलंय.

ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुजरातमध्ये ओबीसी समाजानं आज महाक्रांती रॅलीचं आयोजन केलंय. आणि त्यासाठी आतापासून गर्दी झालीये. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदाबाद बंदची हाक देण्यात आली आहे. प्रशासनही आंदोलनाला सामोरं जायला सज्ज झालंय. आज अहमदाबादमधल्या सर्व शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. या रॅलीसाठी अहमदाबादमध्ये 25 लाख लोक येतील असा विश्वास या आंदोलनाचं नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांनी व्यक्त केलाय.

पटेल यांच्या नेतृत्वाखालील सात मंत्र्यांच्या समितीने ‘पटेल समाजाला असे आरक्षण देण्यासाठी सरकारला काही बंधने आहेत,’ असा अहवाल दिला आहे. ओबीसी आरक्षणाची मागणी करण्यासाठी मंगळवारी पटेल समाजाचा मोठा मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना सरकारने चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलवले होते; पण हार्दिक यांनी समाजाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांना या चर्चेसाठी पाठवून दिले. हार्दिक पटेल हे पटेल समाजातील विविध संघटनांचे नेतृत्व करणार्‍या पाटीदार अनामत आंदोलन समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

कोण आहे हार्दिक पटेल !

1. अहमदाबादपासून 80 किमी अंतरावरील वीरमगाम हे त्याचं जन्मगाव
2. ‘सरदार पटेल सेवादल’चा वीरमगाम युनिटचा अध्यक्ष होता
3. जून 2015 मध्ये पाटीदार अमानत आंदोलन समितीची स्थापना केली
4. पटेल समाजाने हार्दिकला ‘पाटीदार हृदयसम्राट’ ही पदवीच बहाल केली आहे
5. हार्दिकच्या सूरतमधील सभेला 5 लाखांची गर्दी जमली होती
6. हार्दिकला नेमकं कोणाचं राजकीय समर्थन आहे, यावर तर्क-वितर्क सुरुच
7. स्वत: हार्दिक पटेल कोणत्याही राजकीय आशीर्वादाचा इन्कारच करतो.

पटेल समाजाच्या मागण्या काय आहेत
- आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असलेल्या पटेल समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण हवं आहे
- सरकारी नोकर्‍या आणि शिक्षण क्षेत्रात पटेल समाजाला 27 टक्के आरक्षण हवं आहे
- पटेल समाज गुजरात भाजपचा प्रमुख आधारस्तंभ आहे
- ओबीसीच्या यादीत याआधीच असलेल्या 146 समाजांनी याला विरोध केलाय

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close