शेअर बाजार अजूनही अस्थिर, चढउतार सुरूच

August 25, 2015 12:42 PM0 commentsViews:

SENSEX BANNER

25 ऑगस्ट :शेअर मार्केटसाठी कालच सोमवार ब्लॅक मंडे ठरला. आजचा दिवसही शेअर मार्केटसाठी समाधानकारक नाही. आज मार्केट उघडलं तेव्हा त्यात 319 अंकाची वाढ झाली. पण लगेचच सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळलं. तर निफ्टीतही 100 अंकाची घसरण पहायला मिळाली. आताही चढउतार सुरूच आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 66 अंकानी वाढ झालीये. जागतिक बाजारातही घसरण सुरूच आहे.

सोमवारी शेअर बाजारात 1,624.24 अंकाची ऐतिहासिक घसरण झाली. सहा तास चाललेल्या पडझडीच सात लाख रुपयांचा चुराडा झाला. आजही ही घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारात न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज, शांघाय, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारांमध्ये शेअर्सच्या किमतींची घसरण होतेय.

चीननं आपल्या युआन या चलनाचं अवमूल्यन केल्याचे पडसाद जगभर जाणवत आहे. तेलाच्या किमतीही रोज कमी होतायत. सध्या तेल 40 डॉलर प्रति बॅरेल इतकं खाली आलंय. इतर चलनांच्या तुलनेत डॉलरही कमकुवत झालाय. या घसरणीचा केंद्रबिंदू यावेळी पाश्चात्य देश नसून आशिया आहे. आता चीन आपल्या कमकुवत बाजारांना संजीवनी देण्यासाठी काय करतो, याकडे सर्व जगाचं लक्ष लागलंय.

दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना परिस्थितीबाबत माहिती दिली. सरकार आवश्यक ती पाऊलं उचलेलंच, पण हे एक-दोन दिवसांत होणारं काम नाही, असं जेटली यांनी म्हटलंय.

अमेरिकेचा चीनला सल्ला

आपल्या अर्थव्यवस्थेत मोठ्या सुधारणा करा, असा सल्ला व्हाईट हाऊसनं चिनी अधिकार्‍यांना दिलाय. चलनाच्या एक्सेंज रेटमध्ये लवचिकता ठेवा आणि जास्तीत जास्त गोष्टी या बाजाराला ठरवू द्या, असं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिका आणि चीनमध्ये नेहमीच विचित्र नातचं राहिलेलं आहे. दोघांचं फार पटत नाही, पण चीननं अमेरिकेत भरपूर गुंतवणूक केलीय. तर अमेरिकेचा बराच माल हा चीनमध्ये बनतो.

या कंपन्यांना बसला फटका

– ऑईल अँड गॅस,एनर्जी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, धातू,ऑटो, बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्सची जास्त विक्री झाली.
– वेदांता, केर्न इंडिया, टाटा स्टील, गेल, ओएनजीसी, बजाज ऑटो, पीएनबी, येस बँक, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंडाल्को, ऍक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स सर्वात जास्त घसरले

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close