कोल्हापुरात विचित्र अपघात, ट्रकने 12 वाहनांना दिली धडक

August 25, 2015 1:24 PM0 commentsViews:

25 ऑगस्ट : कोल्हापूर शहरात आज एक विचित्र अपघात झालाय. शहरातल्या शाहुपुरी भागातल्या एका गल्लीत एका ट्रकने थेट 10 ते 12 वाहनांना धडक दिलीय. या धडकेत 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.kolhapu accident

रेल्वे विभागाचं सामान घेऊन हा ट्रक चालला होता. त्याचवेळी या ट्रकन 2 रिक्षांना , 7 दुचाकींना आणि 3 चारचाकी गाड्यांना धडक दिलीय. अनेकांनी रस्त्याला लागूनच पाकीर्ंग केल्यामुळं रस्त्याशेजारच्या सगळ्याच गाड्यांना या ट्रकनं धडक दिलीय. या धडकेत 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पण ट्रकचा वेग कमी असतानाही कदाचित ट्रक ब्रेकफेल झाल्यामुळंच हा अपघात घडल्याची शक्यता प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितलं. या घटनेनंतर या भागात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसंच ट्रक चालकानं पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण नागिराकंनी त्याला पकडलं. दरम्यान, या अपघातामुळं कोल्हापूर शहरातल्या अनधिकृत पाकीर्ंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close