जीएसटी विधेयकासाठी सरकारकडून विरोधकांची मनधरणी

August 25, 2015 2:25 PM0 commentsViews:

gst bill25 ऑगस्ट : विरोधकांच्या गोंधळामुळे पावसाळी अधिवेशन वाया गेलं. त्यामुळे जीएसटी विधेयकही रखडलं. पण आता जीएसटी विधेयकासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत केंद्र सरकार आज (मंगळवारी) निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकार विरोधकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतंय.

संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. जीएसटी विधेयकावर आपल्या सूचना सरकारनं स्वीकारायला हव्यात, अशी काँग्रेसची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. इतर पक्षांशीही सरकार चर्चा करतंय. तृणमूल काँग्रेसचा जीएसटीला पाठिंबा आहे आणि तृणमूल विशेष अधिवेशनाच्याही बाजूनं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close