तनपुरे साखर कारखान्यातील कामगारांचा पगार थकला

December 25, 2009 9:45 AM0 commentsViews: 3

25 डिसेंबर अहमदनगर जिल्ह्यातल्या डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांचा तब्बल 27 महिन्यांचा पगार थकला आहे. पगार मिळावा म्हणून या कामगारांनी पुण्यातल्या साखर संकुलासमोर उपोषण सुरू केलंय. या उपोषणाचा शुक्रवारचा चौथा दिवस आहे. पण अजूनही त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. कामगारांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन साखर आयुक्तांनी दिलंय.

close