आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याची हत्या

December 25, 2009 9:48 AM0 commentsViews: 10

25 डिसेंबरगोदिंयातील सालेकसा इथल्या डाहार टोला इथे नक्षलवाद्यांनीच एका आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या केली आहे. जवळपास 25 ते 30 नक्षलवाद्यांनी रघुनाथ मरकाम याची रात्री घरात घुसून हत्या केली. रघुनाथ मरकाम हा 1992 ते 1996 पर्यंत तांडा दलमचा सदस्य होता. त्याच्यावर महाराष्ट्र आणि छत्तीसगड इथे गुन्ह्यांची नोंद आहे. रघुनाथ सध्या नक्षली चळवळीत सक्रीय नव्हता. रघुनाथने गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. तो दरेकसा गावच्या तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होता. त्याच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्यासमोरच रघुनाथची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

close