पंतप्रधान मोदींकडून 28 तारखेला ‘वन रँक वन पेन्शन’ची घोषणा ?

August 26, 2015 8:14 AM0 commentsViews:

M_Id_484311_Narendra_Modi26 ऑगस्ट : वन रँक वन पेन्शन या मागणीसाठी गेल्या 3 दशकांपासून लढणार्‍या माजी सैनिकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. येत्या 28 तारखेला म्हणजे 1965च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवी दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वन रँक वन पेन्शन ची घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

यासंदर्भात मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी बैठकही झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतेही उपस्थित होते.

विशेष म्हणजे, वन रँक वन पेन्शन योजनेबद्दल पंतप्रधान स्वत:हा आग्रही आहेत. या अगोदर त्यांनी या योजनेची घोषणा करू असं आश्वासनं दिलं होतं. तर दुसरीकडे माजी सैनिकांनी अलीकडेच दिल्लीत आंदोलनं केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी धरपकड केल्यामुळे या कारवाईवर सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close