मुंबईवर पाणी संकट, १० टक्के होणार पाणीकपात ?

August 26, 2015 10:35 AM0 commentsViews:

mumbai water326 ऑगस्ट : मुंबईवर लवकरच पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिना संपत असताना पुन्हा पावसाचं आगमन झालं असलं तरी हा पाऊस धरणं आणि तलाव भरण्यासाठी पुरेसा नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईकरांवर 10 टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे.

आज होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासन कपातीबाबतचा प्रस्ताव सदस्यांपुढे ठेवतील. त्यावर स्थायी समितीचे सदस्य निर्णय देतील. सध्या धरणात असलेला साठा हा जून 2016 पर्यंत पुरवावा लागणार आहे. शिवाय कृत्रिम पावसासारखे प्रयोगही आता करणं शक्य होणार नाहीये. त्यामुळे आहे ते पाणी जपून वापरणं हा एकमेव पर्याय शिल्लक असेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close