जनतेचा पाठींबा असल्यास वेगळ्या विदर्भाला विरोध नाही – शरद पवार

December 25, 2009 9:56 AM0 commentsViews: 1

25 डिसेंबर विदर्भातल्या जनतेचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचाही विरोध असणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरणार्‍या सर्वांच डिपॉझिट जप्त झाल्याचंही ते म्हणाले. शिर्डीत झालेल्या एका व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणीही जोर धरू लागली आहे.

close