वाशीच्या खाडी पुलावर अपघात : दोन बहीणींचा मृत्यू

December 25, 2009 10:08 AM0 commentsViews: 4

25 डिसेंबर वाशीच्या खाडी पुलावर झालेल्या 3 वाहनांच्या विचित्र अपघातात दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. प्रणाली शिंदे (16 ) आणि मीनल शिंदे (15) या बहिणींनी अपघातात जीव गमावला आहे. तर प्रकाश शिंदे, सुनिता शिंदे, स्वप्नाली शिंदे यांच्यासह सिद्धार्थ असावलकर हा क्वालीस गाडीचा ड्रायवर जखमी झाले आहेत. जखमींना नवी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे सगळेजण मुंबईहून जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जात होते.

close