संजय दत्त पुन्हा जेलबाहेर, 30 दिवसांचा पॅरोल मंजूर

August 26, 2015 12:06 PM0 commentsViews:

sanjay_dutt4526 ऑगस्ट : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त पुन्हा जेलबाहेर येणार आहे.संजय दत्तला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर झालाय. त्यामुळे तो आता पुन्हा जेलबाहेर येणार आहे. संजयला एक महिन्याचा पॅरोल मंजूर झालाय.

मुलीच्या आजारपणाचं कारण त्याने पॅरोलमध्ये दिलंय. संजयच्या मुलीवर शस्त्रक्रिया होणार आहे यासाठी जुलैच्या अखेरच्या आठवड्यात संजयच्या वकिलांनी अर्ज केला होता. त्याला आज पुण्याच्या विभागीय आयुक्तींनी मंजुरी दिलीये.

संजय दत्त आता चौथ्यांदा जेलबाहेर येणार आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी संजयला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. संजयने अगोदर 18 महिन्यांची शिक्षा भोगलीये.

उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी मे 2013 पासून संजय येरवडा जेलमध्ये आहे. पण आतापर्यंत संजय 146 दिवस जेलबाहेर घालवले आहेत, आणि आता यात 30 दिवसांची भर पडलीय.

संजय दत्त कधी कधी बाहेर आला ?

– ऑक्टोबर 2013 – फर्लो मंजूर, 14 दिवसांची वाढीव सुट्टीही मिळाली
– जानेवारी 2014 – 30 दिवसांचा पॅरोल, दोन महिन्यांचा वाढीव पॅरोलही मंजूर
– डिसेंबर 2014 – 14 दिवसांची फर्लो. वाढीव फर्लोचा अर्ज केला होता, पण भरपूर टीका झाल्यामुळे वाढीव सुट्टी मिळाली नाही
– ऑगस्ट 2015 – 30 दिवसांचा पॅरोल मंजूर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close