‘नो कॉल ड्रॉप्स’ मोहिमेला यश, मोदींनी दिले कॉल ड्रॉपवर तोडगा काढण्याचे आदेश

August 26, 2015 1:48 PM0 commentsViews:

narendra modi26 ऑगस्ट : कॉल ड्रॉपला वैतागलेल्या मोबाईलधारकांना केंद्र सरकारने दिलासा दिलाय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकाराची दखल घेतली असून यावर ताबडतोब तोडगा काढण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहे.

मोबाईलवर आपण समोरच्या व्यक्तीशी काही महत्वाचं बोलत असता आणि मध्येच फोन कट होतो. पण हा काही नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही तर मोबाईल कंपन्यांची कॉल रेट लाटण्यासाठी चलाखी आहे. याबद्दल आयबीएन-नेटवर्कने ‘नो कॉल ड्रॉप्स’ मोहिम राबवली होती. या मोहिमेला आता मोठं यश मिळालंय. ही समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतलीय.

कॉल ड्रॉपवर ताबडतोब तोडगा काढण्याचे निर्देश मोदींनी अधिकार्‍यांना दिलेत. देशभरातल्या मोबोईल नेटवर्कच्या परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला. आणि कॉल ड्रापच्या मुद्द्यावर तीव्र चिंता व्यक्त केली. कॉल ड्रॉपमुळे सर्वसामान्य माणसाला त्रास होतो, असं पंतप्रधान म्हणाले. ही समस्या सोडवण्यासाठी काय करायला हवं, हे स्पष्ट करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close