राजस्थानमध्ये पुल कोसळून 7 ठार

December 25, 2009 10:11 AM0 commentsViews: 4

25 डिसेंबर राजस्थानमधल्या कोटा इथे पूल कोसळून 7 जण ठार झाले आहे. या पुलाच्या ढिगार्‍याखाली अजूनही 50जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कोटा-उदयपूर हायवेवर चंबळ नदीवर बांधण्यात येणारा पूल गुरुवारी संध्याकाळी अचानक कोसळला. त्यावेळी शंभराहून अधिक कामगार तिथे काम करत होते. पुलाचं बांधकाम करणार्‍या दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मदत आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या बचावकार्यात लष्करही सहभागी झालं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

close