मुंबईत उद्यापासून 20 टक्के पाणीकपात

August 26, 2015 4:35 PM0 commentsViews:

Watershortage

26 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांत पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांना आता पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता पालिकेतर्फे मुंबईत उद्यापासून 20 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आज मध्यरात्रीपासून ही कपात लागू होणार आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये साधारण पुढील आठ महिने पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना पाण्याचा वापर आता जपून करावा लागला आहे.

ही पाणीकपात निवासी, औद्योगिक, व्यापारी अशा सर्वच क्षेत्रांसाठी लागू करण्यात आली आहे. याशिवाय स्विमिंगपूल, मॉल्स, हॉटेल, रेसकोर्स, बाटलीबंद पाणी, शीतपेये कारखाने, तारांकित हॉटेल्स, इत्यादी ठिकाणी होणारा पाणीपुरवठ्यावर 50 टक्क्यांपर्यंत पाणी कपात लागूृ करण्यात येणार आहे. तसंच मुंबई महापालिकेतर्फे ठाणे, भिवंडी महापालिका आणि नगरपालिकांना केल्या जाणार्‍या पाणीपुरवठ्यातही 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close