गुजरातमध्ये हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांचा बळी

August 26, 2015 5:40 PM0 commentsViews:

Gujrat Hinsachar

26 ऑगस्ट : गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षणासाठी सुरू झालेल्या हिंसक आंदोलनाने सहा जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या हिंसेचे लोण आता राजधानी अहमदाबादेत पोहोचले आहे. राज्य सरकारने अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली असून जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच हजार जवान तैनात करण्यात आलं आहेत.

पटेल आरक्षणासाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या करणार्‍या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मेहसाना जिल्हात 2, बनासकांथामध्ये 1 तर अहमदाबादमध्ये 3 जणांचा मृत्यु झाला आहे. ठिकठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. दरम्यान काल रात्री आंदोलकांवर लाठीमार करणार्‍या पोलिसांवर 36 तासात कारवाई करा, असा इशारा आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे हार्दिक पटेल याने दिला आहे.

दरम्यान अहमदाबाद शहरातल्या पोलीस चौकीवर आज आंदोलक जमावाने हल्ला चढवला. त्यासोबतच राजधानी अहमदाबादमध्ये आंदोलनकर्त्यांनी रेल्वे ट्रॅक तोडून गाड्या थांबवल्या आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली असून राजधानी एक्सप्रेस आणि आश्रम एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत. हिंसक जमावाने अनेक सरकारी कार्यालयही जाळली आहेत. शहरातील निकोल परिसरात सरकारी सेवा केंद्राची जाळपोळ केली. या जाळपोळ सात लाख रुपयांची रोख रक्कमेसह सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहे.

पटेलांच्या या आंदोलनाने काल रुद्र रुप धारण केलं आणि त्याचेच पडसाद म्हणून आज गुजरात बंद आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून सरकारने काही जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी दिली आहे. काही शहरांमध्ये तणावाचं वातावरण अजूनही कायम आहे. मेहसाणा आणि सूरतमध्ये संचारबंदी लागू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close