कोल्हापूरच्या टोलबंदीला 3 महिन्यांची मुदत वाढ

August 26, 2015 6:01 PM0 commentsViews:

dsarserwecopy

26 ऑगस्ट : कोल्हापूर शहरात आता टोलवरुन पुन्हा एकदा टोलविरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. कोल्हापूरच्या शिरोली नाक्याच्या टोल स्थगितीची मुदत आज संपत असतानाच पुन्हा एकदा या टोल स्थगितीला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

कोल्हापुरातल्या शिरोली टोल नाक्याजवर कृती समितीनं टोलविरोधी आंदोलन केलं. या आंदोलनात राज्य सरकार आणि आयआरबीविरोधात घोषणाबाजीही केली. तसंच टोल रद्द करण्याची मागणीही केली. राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत आयआरबीने टोलवसुली करू नये, असं निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळेच पुढील तीन महिने कोल्हापुरात टोलवसुली होणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मात्र कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका समोर असताना हा प्रश्न चिघळू नये यासाठी राज्य सरकारनं ही मुदतवाढ दिल्याचा आरोप होत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close